Pune Chandani Chowk : मुंबई-बेंगलोर महामार्गावरील चांदणी चौकातील पूल केला जाणार जमीनदोस्त
पुण्याच्या चांदणी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडकल्यानंतर आता प्रशासनाने इथली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केलीये.
याचाच भाग म्हणून मुंबई-बेंगलोर महामार्गावरील चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त केला जाणार.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तसं जाहीर केलंय. 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान हा पूल पाडला जाईल. हे काम सुरू करण्यापूर्वी वाहतुकीतील बदल जाहीर केले जातील.
मुख्यमंत्री पुण्यातील चांदणी चौकाची स्वतः पाहणी करणार
सातारा येथून मुंबईकडे परत येताना मा. मुख्यमंत्री महोदय हे आज दुपारी २.०० वा. पुण्यातील चांदणी चौक येथे थांबणार आहेत, अधिकाऱ्यांशी वाहतूक कोंडीसंदर्भात चर्चा करणार आहेत.





















