Murlidhar Mohol Oath ceremony Modi 3.0 : मुरलीधर मोहोळांचा शपथविधी, .पुणेकरांचा आवाज संसदेत
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रिमंडळाचाही शपथविधी पार पडला. दिल्लीतील या सोहळ्याला सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. मोदी कॅबिनेट 3.0 चा शपथविधी संपन्न झाला आहे.
मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये कोण-कोणत्या नेत्यांना संधी?
मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 72 मंत्र्यांचा समावेश असून यामध्ये 30 केंद्रीय मंत्री, 36 राज्यमंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री यांचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये कोण-कोणत्या नेत्यांना संधी मिळाली आहे, हे जाणून घ्या. मोदी कॅबिनेटमधील सर्व मंत्र्यांची यादी पाहा.
कसं आहे मोदींचं मंत्रिमंडळ?
मोदी सरकार मंत्रिमंडळात 72 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्री यांचा समावेश आहे. मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये सर्व सामाजिक गटांचे नेतृत्व करणारे चेहरे या मंत्रिमंडळात आहेत. यामध्ये 27 OBC, 10 SC, 5 ST, 5 अल्पसंख्याक नेत्यांचा समावेश आहे. यातील 18 मंत्र्यांचा कॅबिनेटमध्ये समावेश आहे.