Corona | पुणेकरांनो मास्क वापरा, हा बेफिकीरपणा महागात पडेल!
पुण्यात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पुण्यातील शाळा, महाविद्यालय 28 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अभ्यासिका सुरुच ठेवण्यात येणार आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासंदर्भातील नियमावलीची कडक अंमलबजावणी करुन ही परवानगी देण्यात येत आहे.
कोरोना परिस्थिती गंभीर वळणावर आलेली असतानाही नागरिकांचा बेफिकीरपणा मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळं कोरोना फैलावण्यास हाच बेजबाबदारपणा कारणीभूत ठरत आहे.






















