Girish Bapat Funeral : भाजप खासदार गिरीश बापट यांना अखेरची मानवांदना
पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांचं निधन झालंय. ते ७३ वर्षांचे होते.. गेल्या अनेक महिन्यांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांची प्रकृती चिंताजनक बनली, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.. मात्र दुपारी सव्वा बाराच्या सुमाराला त्यांचं दुर्देैवी निधन झालं. तीन टर्म नगरसेवक, पाच टर्म आमदार आणि २०१९ साली खासदार, अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. अतिशय मनमिळाऊ, मनमोकळे आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे अशी त्यांची ओळख होती. गेल्या महिन्यात कसबा निवडणुकीच्या प्रचारात त्यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.. तेव्हाही त्यांचं भावनिक आवाहन ऐकून अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते..






















