Eknath Shinde vs Aditya Thackeray Pune : पुण्यात एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने?
आज पुण्यात शिंदे आणि ठाकरे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. आज पुणे दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संध्याकाळी सात वाजता कात्रज भागात बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर कात्रज भागातील शंकर महाराज मठात दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. नेमक्या याचवेळी पुण्यातील कात्रज भागात शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय. आदित्य ठाकरे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सभा आटोपून साडेसहाच्या दरम्यान कात्रजच्या सभेसाठी पोहचणार आहेत. त्यामुळे कात्रजमध्ये हे दोन्ही नेते एकाचवेळी येणार असल्यानं ते एकमेकांवर टीका करणार का याकडे लक्ष लागलंय.....























