D.S. Kulkarni Exclusive : अदृश्य शक्ती माझ्या मालमत्ता कायदेशीर हडप करण्याच्या प्रयत्नात
D.S. Kulkarni Exclusive : अदृश्य शक्ती माझ्या मालमत्ता कायदेशीर हडप करण्याच्या प्रयत्नात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या बंगल्यात आणि कार्यालयात जाण्यास दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांना मुंबई येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. बंगला आणि कार्यालयात असलेले कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे ताब्यात घेण्यासाठी डीएसके यांनी याबाबत अर्ज केला होता.ईडीने पुरेशा कर्मचाऱ्यांसह डीएसके यांचे निवासस्थान आणि कार्यालय उघडावे. डीएसके आणि कुटुंबीयांना त्यात प्रवेश देवून त्यांनी त्यांच्या विरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे जमा करावीत. या सर्व प्रक्रियेचा पंचनामा करून कागदपत्रांच्या योग्य वर्णनासह यादी नोंदवून ठेवावी.ईडी आणि डीएसके यांनी या आदेशाच्या पूर्ततेचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा. ईडी आणि डीएसके असे दोघेही प्रवेश आणि कागदपत्रे घेतानाचे व्हिडिओ शूटिंग घेऊ शकता. कागदपत्रे घेतल्यानंतर बंगला आणि कार्यालय पुन्हा बंद करण्यात यावे, असे आदेशात नमूद आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज करण्यात आली याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी यांनी..