Chandani Chowk Bridge Inauguration: चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनावरून मेधा कुलकर्णींची नाराजी
Chandani Chowk Bridge Inauguration: चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनावरून मेधा कुलकर्णींची नाराजी उद्घाटनावरुन भाजपच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केलीय. चांदणी चौकातील पुलाच्या कामाबाबत मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरवा केला, मात्र आता उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर चंद्रकांत पाटलांचं नाव आणि फोटो असल्यानं मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केलीय. चांदणी चौकातील कामांचं सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांचं असल्याचं मेधा कुलकर्णींनी म्हटलंय. तर आताचे कोथरुडचे नेते सर्व श्रेय त्यांचं असल्यासारखं वागत असून, माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी खंत मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केलीय. हा आरोप करताना मेधा कुलकर्णी यांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलाय.






















