एक्स्प्लोर

Amol Mitkari On Medha Kulkarni : मेधा कुलकर्णींच्या वक्तव्यामुळे संविधानामुळे संभ्रम निर्माण होतो

अकोला: खासदार मेधा कुलकर्णी यांच्या वक्तव्याचा आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार समाचार घेतला आहे. सांगलीच्या एका कार्यक्रमात खासदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपण मिटकरींच्या (Amol Mitkari) व्यासपीठावर कधीच जाणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, मेधा कुलकर्णींची ही माहिती खोटी असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. उलट मेधा कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाविषयी (Brahmin community)  केलेले वक्तव्य संविधान बदलाच्या चर्चेला अधिकृत दुजोरा देणारे ठरु शकते, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

लोकसभेदरम्यान बारामतीच्या एका कार्यक्रमात व्यासपीठावर मेधा कुलकर्णी असल्याने आपणच त्या व्यासपीठावर गेलो नसल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात खोटं बोलणाऱ्या खासदार मेधा कुलकर्णींनी ब्राम्हण समाजाची माफी मागावी, असेही मिटकरी म्हणाले. 

अमोल मिटकरींनी मेधा कुलकर्णींना नेमकं काय प्रत्युत्तर दिलं?

लोकसभा आणि राज्यसभा ही दोन्ही सभागृह भारतीय संविधानाच्या चौकटीत येतात. ज्यावेळेस एखादी व्यक्ती या दोनपैकी एखाद्या सभागृहाची सदस्य होते, त्यावेळी त्याला शपथ दिली जाते. ती शपथ महत्त्वाची असते. ही शपथ घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती एखाद्या समाजाची राहत नाही तर संपूर्ण देशाची होते. पण ही शपथ घेतल्यानंतरही कोणी एखाद्या समाजापुरतं वागत असेल तर भारतीय राज्यघटनेच्या विचारधारेला छेद देण्यासारखं ते आहे. असाच काहीसा प्रकार काल सांगलीत राज्यसभेच्या खासदारांकडून घडला. 

आपल्या भाषणात राज्यसभेच्या खासदारांनी बारामतीमधील एक किस्सा सांगितला. मी अमोल मिटकरींसोबत स्टेज शेअर करणार नाही, असे त्यांनी सांगितले. बारामतीच्या प्रचारावेळी योगायोगाने एक युवक मेळावा होता. त्या मेळाव्याला सुरज चव्हाणही उपस्थित होते. ते आणि मी एका गाडीने गेलो. त्यावेळी अगोदरच या सन्माननीय सदस्या स्टेजवर बसल्या होत्या. जेव्हा आयोजकांकडून मला कळालं तेव्हा मी सांगितलं की, जे लोक स्वत:ला एका समाजापुरतं मानतात, अशा लोकांसोबत मला स्टेजवर बसायचे नाही. त्यामुळे मीच तेथून निघून गेलो. इतक्या दिवसानंतर त्या आठवणींना उजाळा देताना लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी त्यांनी सांगलीत ते वक्तव्य केले. मात्र, एका पदावर असताना त्या एका समाजाच्या ध्येयधोरणांसाठी काम करत असतील तर हे भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत तत्त्वांना छेद देणारी आहे. असंच जर चालू राहिलं तर लोकांच्या मनात राज्यघटनेविषयी  जी शंका आहे, त्याला अधिकृत दुजोरा मिळेल. त्यामुळे खासदारांनी केलेले वक्तव्य साफ चूक आहे. स्टेजवर त्या आल्या नाहीत, हे चूक आहे. मीच स्टेजवर गेलो नाही, हे निर्विवाद सत्य आहे, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

पुणे व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
मोशी दुर्घटना प्रकरण! 48 तास उलटले तरीही आठ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश 
मोशी दुर्घटना प्रकरण! 48 तास उलटले तरीही आठ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा संताप आणि आक्रोश 
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
जयंत पाटलांचा भाजपला टोला; विरोधी पक्षनेता नाही, पक्ष विरोधी नेता मिळाला, भास्कर जाधवही सत्ताधाऱ्यांवर संतापले
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2026 | शुक्रवार 
Share Market Update : शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग दुसऱ्या तेजी, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 6 लाख कोटींची कमाई
Jalgaon Crime: लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
लाचखोरीत अडकलेल्या मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यानेच मेव्हण्याच्या मदतीने स्वतःच्याच घरात घरफोडीचा कट रचला! जळगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्याने एकच खळबळ
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
खरंच आपण दूध पितोय का? दुधात भेसळसाठी वापरली जाणारी 'व्हे पर्मिएट पावडर' जप्त; मराठवाड्यात कारवाई
Embed widget