Ajit Pawar on Rohit Pawar : रोहीत पवार याला सध्या काही उद्योग नाही, अजित पवार भडकले!
पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानापूर्वी शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवार यांना वाटत असेल तर त्यांचा हा विचार हास्यास्पद आहे, असे वक्तव्य रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी गेल्या 20 दिवसांमध्ये 52 सभा घेतल्या आहेत. कधी कधी तर त्यांनी एका दिवसात तीन सभा घेतल्या आहेत, दिवसाला 25 बैठका घेतल्या आहेत. या काळात त्यांनी फक्त चार तासांची झोप मिळायची, ते ८४ वर्षांचे आहेत. याउलट अजित पवार कुठे होते तर सोसासटी, गल्ली आणि गावांमध्ये. त्याठिकाणी अजितदादांना कदाचित आरामही मिळाला असेल. पण शरद पवारांना कुठे आराम मिळाला? त्यामुळे शरद पवार मुद्दाम आजारी पडले, असे अजित पवारांना वाटत असेल तर त्यांचा विचार हास्यास्पद आहे. हे बदललेले अजित पवार कोणालाही ओळखू न येणारे आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.






















