Corona Vaccine | पुण्याला थेट केँद्र सरकारकडून 3 लाख 73 हजार लसीचे डोस; महापौरांचं ट्विट
Pune Corona Vaccine: केंद्र सरकारकडून पुण्याला रातोरात जवळपास अडीच लाख कोरोना लसीच्या डोसची व्यवस्था करुन दिली. तर आज आणखी सव्वालाख डोस पुण्यासाठी उपलब्ध होतील. कोरोना (Corona) लसींचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर तातडीनं लस पुरवठा केल्याबद्दल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
सर्वाधिक सक्रिय रुग्ण असणाऱ्या पुण्याचा अधिक लसींची गरज आहे, यात कुणाचंही दुमत नाही. पण, त्यातच मुंबई आणि इतर शहरांमध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत असताना लस पुरवठ्याच्या बाबतीत पुण्याला प्राधान्य देत केंद्रानं दुजाभाव केला आहे का, असा सवाल महापौर मोहोळ यांच्या ट्विटर पोस्टनंतर उपस्थित केला गेला.






















