Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha 10 August
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha..
हे देखील वाचा
मोठी बातमी : शरद पवार, उद्धव ठाकरेंनी माझ्या नादी लागू नये, सुपारी फेकीच्या घटनेनंतर राज ठाकरेंचा इशारा
छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange) आडून उद्धव ठाकरे, शरद पवारांचं विधानसभेच्या तोंडावर राजकारण सुरु असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केला आहे. माझ्या दौऱ्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे. आताच सांगतो माझ्या वाटेला जाऊ नका, नाहीतर सभाही घेता येणार नाही, माझी पोर काय करतील हे सांगता येत नाही असे म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे, शरद पवारांना इशारा दिला आहे. ते मराठवाड्यात माध्यामांशी बोलत होते. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात आरक्षणाची गरजच नाही या भूमिकेचा पुनरूच्चार राज ठाकरेंनी केलाय. आपल्या दौऱ्याचा जरांगे पाटलांशी काहीही संबंध नव्हता, मात्र आपल्याविरोधात जाणीवपूर्वक प्रचार करण्यात आला असा आरोप राज ठाकरेंनी केलाय.
---