(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldana : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांकडून दोन किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीसाठी रस्तारोको
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृद्धी सारख्या विशाल महामार्गाची स्टेट ड्राईव्ह घेत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच पक्षाचे आमदार संजय गायकवाड हे फक्त दोन किलोमीटर मार्गाच्या दुरुस्तीसाठी रस्ता रोको करून बसलेले आहेत बुलढाणा जिल्ह्यात मोताळा येथील गावातून जाणारा मोताळा नांदुरा राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत या मार्गाची दुरुस्ती व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षाचेच आमदार आज मुख्यमंत्री ज्यावेळेस समृद्धी महामार्गाची टेस्ट ड्राईव्ह घेत आहेत अगदी त्याच वेळेस रस्ता रोको आंदोलनात बसलेले आहेत त्यामुळे एकीकडे राज्यात समृद्धी येण्यासाठी महामार्गाचे लोकार्पण सोहळ्याची तयारी सुरू असताना मात्र मुख्यमंत्र्याचे अतिशय जवळचे आमदार संजय गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे रस्ता रोको करत आहे यामुळे मात्र जिल्ह्यात चर्चेला उदान आले आहे