Ranjit Nimbalkar Nagpur : रणजितसिंह निबांळकरांनी घेतली नागपुरात फडणवीसांची भेट : ABP Majha
महायुतीत सर्वाधिक डोकेदुखी सध्या माढा मतदारसंघावरून झाल्याचं दिसतंय. माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतल्यावर पुन्हा महायुतीत जोरबैठकांचं सत्र सुरू झालंय. आज माढा संदर्भात फडणवीस आणि अजित पवारांच्या पातळीवर बैठका झाल्या. नागपुरात रणजीतसिंह नाईक निंबाळकर, राहुल कुल, आणि जयकुमार गोरे यांनी फडणवीसांशी भेट घेतली. तर माढा मतदारसंघातल्या राष्ट्रवादीच्या नाराजीसंदर्भात अजित पवारांनी देवगिरीवर तातडीची बैठक बोलावली. या बैठकीला रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटणचे आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार प्रभाकर घाडगे उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अजित पवारांची भेट घेत रणजीतसिंह निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्या तक्रारीचा पाढा वाचला.





















