Nitish Kumar - Tejashwi Yadav : JDUचा आता RJD सोबत संसार, नितीश कुमार - तेजस्वी यादव यांनी घेकली शपथ
Nitish Kumar Takes Oath As Bihar New Chief Minister : भाजपशी (BJP) काडीमोड घेतल्यानंतर जेडीयूने (JDU) पुन्हा राजदशी (RJD) संसार थाटलाय. आणि जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपला 'दे धक्का' घेतल्यानं तिथलं जेडीयू-भाजप सरकार काल कोसळलं. नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीची साथ घेत महागठबंधन सरकारची सत्ता बिहारमध्ये आणली आहे. नितीश कुमार यांच्या भूमिकेनं बिहारमध्ये भाजपला झटका बसला आहे. भाजपनं जेडीयू कमकुवत करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत नितीश कुमार यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाराष्ट्रात शिवसेनेत फूट पाडून सत्ता मिळवणाऱ्या भाजपला बिहारमधली सत्ता मात्र गमवावी लागली आहे.