Nilesh Lanke : रस्ते दुरुस्त करा अन्यथा उपोषणाला बसू, आमदार निलेश लंके यांचा इशारा ABP Majha
Nilesh Lanke : रस्ते दुरुस्त करा अन्यथा उपोषणाला बसू, आमदार निलेश लंके यांचा इशारा ABP Majha
अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड, पाथर्डी आणि सोलापूर या तीनही राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेमुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय. आपण याबाबत अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे 7 डिसेंबरपासून याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयामोर उपोषण करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी दिलाय. सोबतच ज्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अहमदनगर दौऱ्यावर होते त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप नीलेश लंके यांनी केलाय, त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी बोलताना म्हंटलंय की, जिल्ह्यातील एकही रस्त्याचे काम प्रलंबित नाही. त्यामुळे आता जोपर्यंत या रस्त्यांचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही. 7 डिसेंबर पर्यंत काम सुरू करण्यासाठी आम्ही मुदत दिली आहे. काम सुरू झाले नाही तर नगर, पाथर्डी, शेवगाव येथील नेत्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.