एक्स्प्लोर
Devendra Fadnavis : तक्रारीची वाट न पाहता कारवाई करावी,गायकवाड मारहाण प्रकरणी मुख्यमंत्र्यांची घोषणा
आमदार संजय गायकवाड यांनी कँटीन चालकाला मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जनमानसात तीव्र रोष व्यक्त झाला होता. एबीपी माझानं ही बातमी सातत्याने लावून धरली होती. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. सुरुवातीला विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घ्यावा अशी भूमिका मांडली होती. मात्र, आता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. "दखलपात्र गुन्हा असेल तर या सगळ्या प्रकरणी पोलिसांनी निश्चितपणे कारवाई करावी. कोणतीही तक्रार येण्याची वाट बघत बसू नये," असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई निश्चितपणे करतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही तक्रार दाखल झाल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो असे म्हटले होते. आता तक्रार नसतानाही कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.
राजकारण
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























