Prajakt Tanpure : आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या आंदोलनावेळी जाळपोळ, आंदोलनावेळी हिंसक वळण
महावितरणकडून शेती पंपाची वीजबिल वसुली जुलमी पद्धतीने केली जात असल्याचे म्हणत याविरोधात राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील महावितरणाच्या उपकेंद्रावर धरणे आंदोलन सुरू केलंय...पाथर्डी तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज रोहित्र सरसकट बंद केले जातात, त्यांना कोणतेही पूर्व सूचना देत नाहीत...अधिकाऱ्यांना विचारणा केली तर उडवा-उडवीचे उत्तरं दिली जातात असा आरोप यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी केलाय...तर यावेळी महाविरणच्या अधिकाऱ्यांना फोन करून देखील अधिकारी धरणे आंदोलनस्थळी आले नसल्याने आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय...पालकमंत्र्यांचं सर्व अधिकाऱ्यांना सुचना दिल्यात की, माझ्या परवानगीशिवाय कोणत्याही बैठकीला जायचे नाही असा आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला






















