MVA Mumbai Morcha : मोर्चात मविआचे नेते संबोधित करणार, सभेसाठीची तयारी पूर्ण
MVA Mumbai Morcha : भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रपेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.