Devendra Fadnavis Full Speech | मराठा आरक्षणावरून ठाकरे, पवारांना टोला, पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी
Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटलांना (Manoj Jarange Patil) माझा सवालच नाहीये. माझा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार साहेब (Sharad Pawar) आणि नाना पटोले (Nana Patole) यांना आहे की, या आंदोलनामध्ये तुमची भूमिका स्पष्ट करा, तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोले साहेब तुमचं समर्थन आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला आहे. भाजपच्या मेळाव्यातून ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज राज्यामध्ये एक विचित्र अशा प्रकारची स्थिती आहे. ही अशी स्थिती आहे जी आपण राज्यात कधीच बघितली नव्हती. आज अनेक समाज एकमेकांसमोर उभे आहेत आणि दुर्दैवाने या राज्यातल्या काही नेत्यांना असं वाटतं की, हे समाज एकमेकांसमोर उभे राहिले तरच आपण निवडून येऊ शकतो. म्हणून त्याच्यामध्ये पेट्रोल टाकण्याचं काम काही राज्यकर्ते करतायेत.