Santosh Bangar : सरकारमध्ये असलं म्हणून आवाज उठवायचा नाही का?, संतोष बांगर यांची प्रतिक्रिया
सरकारमध्ये असलं म्हणून आवाज उठवायचा नाही आम्ही काय हातात बांगड्या घातल्यात का? प्राचार्याने एका महिलेवरती अन्याय केला,माहिलेवर अत्याच्यार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नाही. सरकारमध्ये असले म्हणून आवाज उठवायचं नाही हे आम्हाला सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलं नाही.. हा प्रकार होऊन आठ दिवस झाले मात्र प्रचाराने आजवर माझ्या विरुद्ध का तक्रार दिली नाही. सरकार आमचंच, मात्र सरकार मध्ये राहुन आवाज उठवावा लागतो, आम्ही काय हातात बांगडया घातल्यात का?अन्याया विरोधात लढा देत शिवसैनिकाच कर्तव्य.. महिलेची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आम्ही गप्प बसलो नाही तर प्रचार्यावरती गुन्हा दाखल झाला असता.




















