Amol Mitkari On Ajit Pawar: अजित पवार नाराज नाहीत, ते आपली भूमिका स्पष्ट करतील : मिटकरी
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार (Ajit Pawar) केंद्र बिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे आणि अजित पवार त्यावर वारंवार खुलासा देखील करत आहेत. सोमवारीही त्यांनी पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची चर्चा होती. तसंच आज आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा होत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अनेक आमदार मुंबईकडे निघाल्याची माहिती आहे. प्रत्येकजण आपल्या खाजगी कामासाठी निघाल्याचं सांगतायत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना नेते त्यांच्या भाजप प्रवेशावर वक्तव्य करून अजित पवारांच्या चर्चेला खतपाणी घालत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मोठं स्पष्टीकरण दिले आहे आज मी आमदारांची कोणताही बैठक बोलावली नाही. एवढंच नाही तर सोमवारी कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय. काहीही असो आपल्याच नावाची चर्चा वारंवार का होतेय? यांचं उत्तर अजित पवार कधी देणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.