Jayant patil And Devendra Fadnavis : ड्रग्ज प्रकरणात 24 हजार लोकांवर कारवाई : देवेंद्र फडणवीस
तर शिंदेंची जोरदार बॉलिंग सुरू असतानाच, गृहमंत्री फडणवीस यांनीही जोरदार बॅटिंग केली... ललित पाटील याचा ड्रग्जचा कारखाना 2020 साली सुरु झाला असल्याचा दावा करत, फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या कोर्टात चेंडू टोलवला. आम्ही मात्र, ड्रग्जबाबत सर्वात मोठी कारवाई केल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, २४ हजार लोकांवर कारवाई करण्यात आल्याचं फडणवीस म्हणालेत. तसेच, खुनाच्या गुन्हेगारीबाबत महाराष्ट्र २० व्या स्थानी असल्याची माहिती फडणवीसांनी दिलीय. दरम्यान, नागपुरातील गुन्हेगारीबाबत जयंत पाटलांनी केलेल्या आरोपांवरही फडणवीसांनी उत्तर दिलंय. नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांचं नागपूरवरील प्रेम वाढल्याचा टोमणा फडणवीसांनी मारला.
















