Congress Hunger Strike | महाविकास आघाडीत काँग्रेसचे 11नाराज आमदार उपोषणाला बसणार- कैलास गोरंट्याल
काँग्रेसचे 11 आमदार उपोषणाला बसणार असल्याची माहिती जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिली आहे. त्यांच्या या दाव्याने महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस हा सत्तेत सहभागी आहे. मात्र निधी वाटपा बाबत काँग्रेसच्या आमदारांसोबत दुजाभाव होत असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केलाय. याबाबत राज्यातील पक्षश्रेष्ठींशी चर्चा केली असून त्यांचं मुख्यमंत्र्यांशीही बोलणं झालंय. मात्र अद्याप काही न्याय मिळाला नसल्याची भावना गोरंट्याल यांनी व्यक्त केली असून लवकर सोनिया गांधींचीही भेट घेणार असल्याचं म्हटलंय. जालना शहरासह मतदारसंघ विकासकामासाठी नगरविकास खात्याकडे वारंवार निधीची मागणी करण्यात आली. निधीसाठी काँग्रेसच्या 11 आमदारांनी पाठपुरावा केला, मात्र मागणीनुसार निधी काही मिळत नसल्यामुळं काँग्रेसमधील आमदार नाराज आहेत.



















