लोकप्रतिनिधीच निष्काळजी मग जनता नियम कसे पाळणार? दिग्गज नेत्यांच्या चेहऱ्यावरील मास्क गेले कुठे?
पुणे पोलीस आणि पुणे महापालिका माजी खासदार धनंजय महाडिक आणि त्यांच्या पाहुण्यांवर कारवाई करणार का? हा सवाल उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या आवाहानाला हरताळ फासत महाडिकांच्या मुलाच्या लग्नात जमलेली गर्दी.महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना धनंजय महाडिकांचे पुत्र पृथ्वीराज यांचा मगरपट्टा परिसरातल्या लॉन्सवर शाही विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यातल्या गर्दीनं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला.
विशेष म्हणजे काल संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना गर्दी टाळा, मास्क घाला अन्यथा लॉकडाऊन अटळ आहे असा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांनी हा इशारा देऊन तासही उलटला नाही तोच त्याला महाडिकांच्या मुलांच्या लग्नात पायदळी तुडवण्यात आलं. अनेक जण विनामास्क वावरत होते.. धक्कादायक बाब म्हणजे सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. त्यातल्या अनेकांच्या चेहऱ्यावरुन मास्क गायब झाला होता.
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/53668dffb85b3742c672a1eda65b78521739693655706976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/a6ec00c20623065a0cade1c045c069141739690183429976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 16 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/6b1391963199637152f41029fd40f9da1739689530318976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)