एक्स्प्लोर
Parinay Fuke | परिणय फुके यांची कविता; 'Hindi' GR रद्द झाल्याने Fadnavis यांचे आभार माना!
विधान परिषदेमध्ये भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी ठाकरे बंधूंवर टोलेबाजी करणारी कविता सादर केली. हिंदीचा जीआर (GR) रद्द केल्यामुळे ठाकरे बंधूंनी उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आभार सभाच घ्यायला हवी, असे फुके म्हणाले. त्यांनी माध्यमांतून ही मागणी केली. फुके यांनी सादर केलेल्या कवितेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. "घरात आईला म्हणतात मम्मी, मोर्चामध्ये जाणार आम्ही। कॉन्वेंट मध्ये घेणार शिक्षण, मराठीचं करणार रक्षण।" अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर टीका केली. "सुट्टीसाठी आहे युरोप। दुसऱ्यांवर करणार आरोप। सत्तेसाठी वेगळे झालो, सत्तेसाठी एकत्रित आलो। लाथांडलेले जनतेने काय करतील? कोण जाणे?" असेही फुके म्हणाले. हिंदुत्वाच्या भूमिकेवरूनही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "हिंदुत्वाचे कधी दुकान। कधी प्यारी टिपू सुलतान।" असे फुके यांनी म्हटले. मराठीच्या मुद्द्यावर बोलताना, "कास मराठीची धरली, निवडणुकीत केमचो वरली। धारावीत दाखवली रुबाब। लुंगी बहादूर छोटे नवाब।" असे शब्द वापरले. "भारतभर बारा बार चिंध्या, एक ना धड। अस्तित्वाची धडपड। बुडा खालून गेल्या खुर्च्या, बनून मराठीचा मोर्चा। मोडीत कधीच निघाला ब्रँड। सावभवानं वाजले बँड।" अशा शब्दांत त्यांनी ठाकरे बंधूंच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले.
महाराष्ट्र
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक

एबीपी माझा वेब टीम
Opinion
















