Sankarshan Karhade : परभणीत खूप चांगल्या कलाकारांची फळी पण नाट्यगृहाचा उकिरडा झालाय
आपल्या गावात प्रयोग करता येत नाही याचे खूप वाईट वाटते - संकर्षण कऱ्हाडे
- नटराज रंगमंदिराची दुरवस्था
- परभणी नाट्यमंदिर पुन्हा सुरू व्हावे
- परभणीतील नाट्यगृहाचा उकिरडा झाला आहे हे मी ऐकले आहे
- परभणीत खूप चांगल्या कलाकारांची फळी आहे
सिने अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे आपल्या गावात आपण लिहिलेलं नाटक आपल्या करता येत नाही अशी खंत व्यक्त केली होती त्यानंतर एबीपी माझा सोबत बोलताना परभणी चे नाट्यगृह हे उकिरडा झाल्याचे अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी सांगितले परभणीतील नटराज रंगमंदिरात अनेक दिग्गज अभिनेत्यांनी प्रयोग केले आहे आता तिकडे प्रयोग होत नाही याची खंत वाटत आहे मंगलकार्यलय चे मानधन हे नाट्य संस्थेला परवडत नाही एकेकाळी परभणीचे नाट्यनागरी इकडच्या लोकांनी फुलवली होती तरी आता त्याचे पूढे काही होत नाही त्याचे खुप वाईट वाटत असल्याचे संकर्षण कऱ्हाडे यांनी सांगितले त्यांचा सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी























