एक्स्प्लोर
Parbhani : तानाजी सावंत आणि त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निधीवरून संघर्ष
परभणी जिल्ह्यात पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि त्यांच्याच शिवसेनेच्या नेत्यांमध्ये निधीवरून संघर्ष सुरू झालाय. इतका की सावंत यांनी मंजुरी दिलेल्या दीडशे कोटींच्या निधीला स्थगिती देण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलीय. परभणी जिल्हा नियोजन समितीचा निधी स्वतःच्या शिवसेनेला सोडून इतर पक्षांना वाटप केल्याचा आरोप प्रवीण देशमुख यांनी केलाय. त्यामुळे भविष्यात पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत आणि शिवसेनेतील स्थानिक नेत्यांमध्ये संघर्ष होण्याची चर्चा आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















