Parbhani Man Celebrates Girl Child : 2 किलो जिलेबी आणि सोन्याचं नाणं, मुलींच्या जन्माचं अनोख स्वागत
मुलगी शिकली प्रगती झाली.. अशी म्हण आपण अनेकदा वाचलीये,ऐकलीय..पण देशात अजुनही स्त्रीभ्रूण हत्या झाल्याच्या घटना आपण बघतो. मात्र यालाच छेद देत परभणीतल्या एका तरुणानं एक अनोखा उपक्रम राबवलाय.. मुलींच्या जन्माचं स्वागत हे उत्साहात व्हावं यासाठी एका तरुण व्यावसायिकानं मुलींना जिलेबी आणि सोन्याचे नाणे भेट देण्याचा उपक्रम हाती घेतलाय. सनी सिंग हा तरुण गेल्या 12 वर्षांपासून हा उपक्रम राबवतोय. एक जानेवारीला जन्मलेल्या मुलींना प्रत्येकी 2 किलो जिलेबी भेट तर देतोच. मात्र त्या सोबतच दिवसभरात जन्म झालेल्या मुलींची नावं लकी ड्रॉ पद्धतीनं काढून विजेत्याला सोन्याचं नाणंही भेट देतो. त्याच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.






















