एक्स्प्लोर
Jaipur Mumbai Express Firing News : वापी आणि पालघर दरम्यान 5 वाजता गोळीबार, चार जणांचा मृत्यू
मुंबईलगतच्या पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जयपूर एक्स्प्रेस या लांब पल्ल्याच्या ट्रेनमध्ये रेल्वे सुरक्षा बळ अर्थात आरपीएफच्या हवालदारानं गोळीबार केला, यामध्ये आरपीएफच्याच एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह ३ प्रवाशांचा मृत्यू झालाय.. जयपूर एक्सप्रेसच्या बी-५ या डब्यात पहाटे पाचच्या सुमाराला ही घटना घडली. वापी आणि मीरा रोडदरम्यान गोळीबार झाला.. हल्ला करणाऱ्या हवालदाराचं नाव चेतन असल्याचं कळतंय, तो सध्या जीआरपीच्या ताब्यात असल्याचं कळतंय. त्याला बोरिवलीत आणण्यात आलं आहे. चारही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
आणखी पाहा























