एक्स्प्लोर
Navi Mumbai : खारफुटीवर भूमाफिया आणि डेब्रिज माफीयांचा घाला ABP Majha
नवी मुंबईतील खाडीकिनारी असलेल्या मँग्रोव्हजची कत्तल करून त्या ठिकाणी भराव घालण्याचं काम भूमाफियांकडून सुरू आहे. जुईनगर सेक्टर २२ येथील रेल्वे वसाहतीच्या मागील बाजूस असलेल्या मँग्रोव्हजच्या परिसरात भराव टाकून तिथलं जंगल नष्ट करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. त्याकडे नवी मुंबई महापालिका डेब्रिजविरोधी पथक आणि वनविभागाचे अधिकारीही दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पाहूयात आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलनं घेतलेला आढावा.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पुणे























