एक्स्प्लोर
Nashik | रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण;जिल्हा रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
एका दिड वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात समोर आली असून जिल्हा रुग्णालयाचा सुरक्षेचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आलाय. अपह्रत मुलीला घेऊन तिची आई आणि मावशी आज सकाळी 11.30 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आली होती. बहिणीला बाळंतपणासाठी दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याने मुलीची आई धावपळ करीत होती. यावेळी ती चिमुकली प्रसूती कक्षाबाहेरच झोपी गेली होती. दुपारी दोन वाजेच्या सुमारास आई बाहेर आल्यानंतर मुलगी दिसेनासी झाल्याने आईने सर्वत्र शोधाशोध केली मात्र ती आढळून आली नाही. याचवेळी पोलिस आणि रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक व्यक्ती मुलीला खांद्यावर घेऊन जाताना दिसून आला. या प्रकारामुळे नाशकात एकच खळबळ उडालीय याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरु असून संशयिताचा शोध सध्या पोलिस घेतायत. हे कुटुंब परप्रांतीय असून मूळचे ते मुंबईचे आहेत मात्र बहिणीच्या प्रसूतीसाठी ही महिला मुलीसोबत नाशिकमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी दाखल झाली होती.
नाशिक
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
Chhagan Bhujbal Nashik : अधिवेशनात जाणार नाही भुजबळांचा आक्रमक पवित्रा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement