Nashik Weddings | ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या गटातील नेत्यांच्या लग्नसोहळ्यांची चर्चा
नाशिकमध्ये आज दोन मोठ्या लग्न समारंभाची चर्चा सध्या जोर धरतेय...ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार आहेत...महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या घरी लग्नसोहळा आहे...या सोहळयाचं उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण आहे... मात्र ते जाणार की नाही याबाबत अद्याप निश्चित माहिती नाहीये...खासदार संजय राऊत मात्र या सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत...दुसरीकडे फडणवीसांच्या पुतण्याचं देखील लग्न आहे...माजी मंत्री शोभा फडणवीसांचे नातू तन्मय यांचा विवाह सोहळा देखील नाशकात पार पडतोय..संदिप सुराणा यांची कन्या सिद्धी यांच्याशी हा विवाह पार पडतोय...फडणवीस या लग्नासाठी कालपासून नाशकात मुक्कामी आहेत...राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन देखील लग्नसोहळ्यात सहभागी झालेत...
ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित, वधुवराला दिल्या शुभेच्छा, यावेळी दादा भुसेही उपस्थित.
कोण कोणाच्या लग्नाला येते हा काय राष्ट्रीय विषय आहे का असं संजय राऊत म्हणालेत...मंगलकार्यात कुणी कुणाला आशीर्वाद द्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्याचंही राऊतांनी म्हटलंय...






















