Raj Thackeray on Farmers : मदत करत नाहीत त्यांना मतदान करता, अडचणीच्या काळात माझ्याकडे येता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा नाशिक दौऱ्याचा आजचा शेवटचा दिवस असून एक्सप्रेस ईन हॉटेलला आज ते शेतकरी संघटना, क्रेडाई संघटना, वास्तूविशारद संघटना आणि मनसेच्या ग्रामीण पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. थोड्याच वेळात शेतकऱ्यांची राज ठाकरेंसोबत बैठक होणार असून जिल्हा बँकेकडून सुरू असलेली सक्तीची वसुली थांबवण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी हिच मागणी घेऊन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता मात्र हवा तसा तोडगा न निघाल्याने शेतकरी नाराज असून आज पुन्हा राज ठाकरेंकडे त्यांनी धाव घेतली आहे. दरम्यान या शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..























