(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Hospital : सफाई कर्मचारी महिलेच्या धक्काबुक्की मुळे गरोदर महिलेचा बाळ दगावल्याचा गंभीर आरोप
नाशिक जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरोदर महिलेला सफाई कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच ईतर कोणीही लक्ष न दिल्याने तिचे बाळही दगावल्याचा गंभीर आरोप पिडीत महिलेने केला असून याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी समिती नेमण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी पेठ तालुक्यातील एक महिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती, बुधवारी महिलेच्या पोटात दुखू लागताच स्वच्छतागृहात ती जात असतानांच सफाई करणाऱ्या कर्मचारी महिलेने या गरोदर महिलेला बाथरुम मध्ये जाण्यास अडवत तिला धक्काबुक्की केली तसेच तुझ्यावर खोटी पोलिस केस करेन अशी धमकी दिल्याचा आरोप महिलेने केलाय विशेष म्हणजे प्रसूतीवेळी कोणीही डॉक्टर उपस्थित नसल्याने बाळ दगावल्याचही तिचे म्हणणे आहे. दरम्यान याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली असून शुक्रवार दुपारपर्यंत अहवाल प्राप्त होताच कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक अशोक थोरात यांनी दिलय.