Nitesh Rane : खांद्यावर भगवं उपरणं, हाती आरतीची थाळी; नितेश राणेंकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात महाआरती
Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर मंदिराचा (Trimbakeshwer Mandir) वाद अद्यापही जैसे थे असून एकीकडे ग्रामस्थांकडून वादावर पडदा टाकण्यात आला असताना आता भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंदिरात महाआरती करण्यात आली आहे. याचबरोबर मंदिर बचाव समितीच्या वतीने देखील आरती करण्यात आली आहे. यावेळी माजी आदिवासी मंत्री अशोक उईके हे देखील उपस्थित होते.
मागील आठवड्यात देशभरात त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचे प्रकरण चांगलेच गाजले. राज्यभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक नेत्यांनी भूमिका मांडल्याचे दिसून आले. दुसरीकडे गावकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेत वाद मिटवण्यात आला. मात्र अद्यापही या प्रकरणावरून राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच आमदार नितेश राणे हे आज नाशिक दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल होत दर्शन घेतले. त्याचबरोबर विविध संघटनाच्या माध्यमातून मंदिरात महाआरती करण्यात आली.