एक्स्प्लोर

आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरण : नाशकात भ्रष्टाचाराचा कोणताच गुन्हा नाही ; मंत्री अनिल परबांना दिलासा

RTO Corruption Case : परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिकमध्ये कोणताच गुन्हा घडला नसल्याचं पोलीस चौकशीतून निष्पन्न झालं आहे. निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी 15 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या, अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.

निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारिनंतर पोलिसांनी कथित आरटीओ भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत पोलिसांना भ्रष्टाचार झाल्याचं आढळलं नाही. त्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांनाही क्लिन चीट देण्यात आली आहे. नाशिकमध्ये अशा प्रकारचा कोणताच गुन्हा घडला नाही, असं पोलीस चौकशीतून स्पष्ट झालं आहे. नाशिक क्राईम ब्रँचच्या माध्यमातून ही चौकशी सुरु होती. तक्रारदारसह, वरिष्ठ अधिकारी आणि इतर अशा 30 हुन अधिकांचे जबाब याप्रकरणी नोंदवण्यात आले होते. 

निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु, त्यांची तक्रार ही केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नसून ही संपूर्ण राज्यातील आरटीओच्या इतर विभागांमध्येही अशाच स्वरुपाचे गैरव्यवहार झालेत, अशी त्यांची तक्रार होती. नाशिकमध्ये असा गुन्हा घडला नाही, परंतु, राज्यांतील इतर आरटीओ विभागांत काय घडलं आहे? याचा संपूर्ण अहवाल नाशिक पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे नाशकात क्लिन चीट मिळाली असली तरी राज्यांतील इतर विभागांत काय घडलंय हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु, तुर्तास तरी या प्रकरणी नाशकात काहीच घडलं नसल्यानं परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Marathi Actor Hrishikesh Kanade: मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
मराठी रंगभूमीवर शोककळा; तरुण अभिनेत्याचं निधन, अवघ्या 38 व्या वर्षी अकाली एक्झिट
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget