Nashik Rescue Operation : नाशिकच्या दुगारवाडी धबधब्यावरील रेस्क्यू ऑपरेशनचा थरार कॅमेऱ्यात कैद
Maharashtra Rain : सध्या राज्याच्या विविध भागात पावसानं धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. मुंबईसह परिसरात देखील जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच दुसरीकडे राज्यातील मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्याचबरोबर कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, येत्या 24 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर काही ठिकाणी अतीवृष्टीचा इशारा देखील देण्यात आला आहे.























