Nashik Corporation : नाशिक महानगरपालिकेच्या परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन
नाशिक महानगरपालिकेच्या परिवहन महामंडळाच्या काही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून राजीनामाचा इशारा दिला आहे, दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा वाहकाचा दावा आहे, 1 सप्टेंबर 2022 रोजी कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन केले त्यावेळी वेळेवर पगार देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वसन पाळले नाही, दिवाळीचा बोनस ही मिळाला नसल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. मागण्या मान्य होत नसल्याने कर्मचाऱ्यांनी राजीनामा अस्त्र उगारले आहे, सध्या सकाळची बस वाहतूक सुरळीत सुरू आहे, उर्वरित वाहक दबावामुळे कामावर रुजू आहेत मात्र तेही आंदोलनात सहभागी होतील असा आंदोलकांना विश्वास आहे, आंदोलक कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी






















