एक्स्प्लोर
Nashik Lok Sabha : महायुतीतला तिढा वाढला? महंत Aniket Shastri भाजपकडून लढण्यास इच्छुक
नाशिकच्या जागेबाबत महायुतीतला तिढा कायम असताना आता त्यात महंत अनिकेत शास्त्री यांनी उडी घेतली आहे. महंत अनिकेत शास्त्री हे अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहेत. ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राज्य आणि केंद्र स्तरावर आपल्या उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा सुरू आहे, असा दावा त्यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. येत्या दोन दिवसांत आपण अर्ज भरणार असल्याचं देखील ते सांगतायेत.
आणखी पाहा






















