Nashik Crime : धक्कादायक! स्वत: आरोपी, 15 वर्ष फरार; मात्र चालवत होता पोलीस प्रशिक्षण केंद्र
तब्बल 14 वर्ष फरार झालेला आणि नांदेडला पोलीस प्रशिक्षण केंद्र चालवत असलेल्या संतोष मुळे या आरोपीने MSC Electronics चे शिक्षण घेतले आहे तो MPSC ची देखिल तयारी करत होता. पत्नी आणि दोन मुलं असा त्याचा परिवार आहे. मूळचा तो नगर जिल्ह्यातील रहिवासी असून गावी शेतीही करायचा. नाशिकला आल्यानंतर श्रीमंत होण्याची ईच्छा असल्याने त्याने फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. नाशिक जिल्ह्यातील 49 जणांना त्याने 51 लाखांना गंडा घातलाय. जिल्हा परिषद, महापालिका आणि ईतर शासकीय कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष तो दाखवायचा आणि त्याबदल्यात 50 हजार ते 2 लाख रुपये तो घ्यायचा. नांदेडला त्याने सुरू केलेल्या पाटील पोलीस प्रशिक्षण अकादमीत सध्या 100 हुन अधिक जण प्रशिक्षण घेत होते अशी चर्चा आहे.























