Nashik Farmers Protest : नाशिकच्या दिंडोशीमधून निघणार लॉँग मार्च, शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत धडकणार
Nashik Farmers Protest : नाशिकच्या दिंडोशीमधून निघणार लॉँग मार्च, शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईत धडकणार
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे... मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटनांनी एकत्र येत हा लाँगमार्च काढलाय... नाशिकच्या दिंडोरीमधून हा लाँगमार्च निघाला असून... शेतमालाला योग्य भाव मिळावा, अवकाळीने झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी त्याचसोबत, वनजमिनींचा हक्क मिळावा यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा हा एल्गार पुकारलाय. नाशिकमध्ये एकत्र जमून हा मोर्चा मार्गस्थ झालाय, आता मजल-दरमजल करत आणि पायी चालत हा लाँगमार्च मुंबईत येऊन धडकणारेय. महत्त्वाचं म्हणजे, पाच वर्षांपूर्वी याच लाल बावट्याचा मोर्चा मुंबईत येऊन धडकला होता. तो मोर्चाही नाशिकमधूनच निघाला होता, आताच्या ज्या मागण्या आहेत, त्याच मागण्या तेव्हाही होत्या. आणि अनेक शेतकरी रक्ताळलेल्या पायांनी त्या मोर्चामध्ये चालत असल्याचं चित्र अजूनही अनेकांच्या लक्षात आहे.