Nashik : Har Har Mahadev सिनेमाचे सर्व शो रद्द, तात्काळ शो सुरु करण्याची मनसेची मागणी
नाशिकमध्ये हरहर महादेव चित्रपटाचा वाद आणखी वाढू लागलाय. एकीकडे हा चित्रपट लावावा म्हणून मनसे चित्रपटगृहांकडे आग्रह धरतेय. तर दुसरीकडे संभाजीराजेंची स्वराज्य संघटना चित्रपटाविरोधात आक्रमक झालीय. नाशिकच्या उपनगरातील आयनॉक्स थिएटरमध्ये स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून चित्रपटाचा शो सुरु करू नका अशी मागणी केली. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावरून आज नाशिकमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा एकही शो कोणत्याही थिएटरमध्ये लावण्यात आलेला नाही. त्यामुळे मनसेनं आक्रमक भूमिका घेत सिनेमा सुरु करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे शिवरायांचे वंशज असलेल्या संभाजीराजेंची संघटना चित्रपटाविरोधात आक्रमक झालीय.























