Nashik Christmas : नाशकात नाताळनिमित्त ख्रिस्ती बांधवांचा उत्साह शिगेला, देखाव्यांच्या कामाला वेग
नाताळचा सण आता अवघ्या काही तासांवर आल्याने ख्रिस्ती बांधवांचा उत्साह शिगेला पोहोचला असून यंदा कोरोना पाठोपाठ ओमायक्रॉनचा जरी धोका कायम असला तरी मात्र शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत हा सण जल्लोषात साजरा केला जाणार आहे. माझे चर्च, माझी जबाबदारी हा उपक्रम हाती घेत नाशिकच्या चर्चमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गर्दी टाळण्यासाठी प्रार्थना तिन टप्प्यात घेण्यात येणार आहे, हस्तांदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे तसेच चर्चमधील गायनाची पुस्तके, बायबल हाताळता येणार नसून मास्क असेल तरच चर्चमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ख्रिसमस ट्री, फुलं, पताके, स्टारबेल आणि ईतर साहित्यांनी चर्च सध्या सजवण्यात येत असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे तर चर्चबाहेरील परिसरातही गव्हाणी आणि देखाव्यांच्या कामालाही वेग आलाय. दरम्यान संत आंद्रिया चर्चमध्ये कशी सुरु आहे तयारी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय घेतली जाते आहे खबरदारी ? याचा आढावा घेत फादरशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..