दोषमुक्त झाल्यानंतर Chhagan Bhujbal यांचं जंगी स्वागत, नाशिकच्या फार्महाऊसवर भुजबळांचं वेलकम!
महाराष्ट्र सदनाच्या तथाकथित घोटाळ्याचा आरोप छगन भुजबळ यांच्यावर होता. पण त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. त्यांनतर आता त्याचं नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे.
महाराष्ट्र सदन आर्थिक घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा देत मुंबई सत्र न्यायालयानं दोषमुक्त केलं आहे. याप्रकरणी आपल्याविरोधात लावण्यात आलेले आरोप हे निराधार असून ते रद्द करण्याची मागणी भुजबळांनी मुंबई सत्र न्यायालयाकडे केली होती. मुंबई सत्र न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या निर्णयानंतर हायकोर्टात धाव घेणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणात आरोपींविरोधात कुठलेही सबळ पुरावे एसीबीकडे उपलब्ध नाहीत, असं कोर्टानं आज निर्णय देताना म्हटलं आहे. महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणातून छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख, गीता जोशी, संजय जोशी या सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.