एक्स्प्लोर
Nandurbar : नंदूरबारमधील धडगाव परिसरात 2 दिवसांपासून बत्तीगुल, आरोग्य आणि बँकिंग सेवेवर परिणाम
नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात 2 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला झालाय. त्याचा सर्व सामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय. विजेअभावी आरोग्य सेवा तसंच बॅँकिंग सेवेवरही परिणाम झालाय. बँकिंग सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. 2 दिवसांपासून वीज नसल्याने धडगाव शरातील अनेक पेट्रोल पंप बंद झाले आहेत शहरातील एकच पेट्रोल पंप चालू असल्याने पेट्रोल पंपावर वाहन धारकांनी रांगाच रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय... दरम्यान वीज पुरवठा कधी पुर्ववत करण्यात येईल या संदर्भात नागरिकांना कोणत्याही प्रकारची माहिती न मिळाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येतेय.
आणखी पाहा























