Abdul Sattar Meet Ashok Chavan : अब्दुल सत्तार आणि अशोक चव्हाणांची भेट, दोघांमध्ये 15 मिनिटं चर्चा
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे नांदेड़ दुष्काळी पाहणी दौरा केल्या नतंर कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या घरी भेट देऊन चहापान घेतले.दरम्यान अशोक चव्हाण हे माझे मार्गदर्शक आहेत,त्यांचा अशिर्वाद घेण्यासाठी मी चव्हाण यांच्या घरी भेट दिल्याचे सांगितले. तर चव्हाण यांनी आमची 25 वर्षा पासुन ची मैत्री असून यावेळी कृषी महाविद्यालय सुरू करणे आणि इतर विषयांवर चर्चा केल्याचे चव्हाण यांनी सांगितले.. मंत्री सत्तार यांच्या कृषी विभागाच्या मराठवाडा स्तरीय आढावा बैठकीस चव्हाण उपस्थित होते. त्यावेळी चव्हाण यांची सत्तारांना चहापानासाठी निमंत्रण दिले होते. दरम्यान, सत्तार आणि चव्हाणांच्या बंद खोलीत बैठकी मुळे राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलय.























