Nagpur Crime : नागपुरमध्ये भाजपचे नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून 35 लाखांचे दागिने चोरीला
नागपूर मधील भाजपचे वरिष्ठ नगरसेवक संदीप गवई यांच्या बंगल्यातून चोरट्यांनी तब्बल 35 लाखांचे दागिने लंपास केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे दागिने चोरण्यासाठी चोरट्यांनी तिजोरी उघडण्याची तसदीही घेतली नाही. तर चक्क 70 किलो वजनाची लोखंडी तिजोरीच चोरट्यांनी पळवली आहे. संदीप गवई आणि त्यांचे कुटुंबीय 18 ऑक्टोबर रोजी मुंबईला गेले होते. 23 ऑक्टोबर रोजी ते नागपूरला परत आले. त्यावेळी तिजोरीतून काही सामान काढण्यासाठी गवई यांच्या पत्नीने तिजोरी ठेवलेली खोली उघडली असता संपूर्ण तिजोरी बेपत्ता असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी गवई यांचा बंगला आणि परिसरातील गेल्या पाच दिवसातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप चोरांबद्दल कुठलाही सुगावा लागलेला नाही..



















