एक्स्प्लोर
Nagpur Sana Khan Case : सना खान हत्येतील आरोपी अमित साहूची नार्को टेस्ट होणार?
सना खान यांची हत्या होऊन २६ दिवस झालेत. अजूनही त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. जबलपूरला गेलेल्या सना खान परत आल्याच नाहीत. त्यामुळे काहीही करा, पण माझ्या मुलीचा मृतदेह मिळवून द्या, अशी विनवणी सना खान यांच्या आई मेहेरूनिस्सा खान यांनी नागपूर पोलिसांना केलीय. त्याचवेळी यातील मुख्य आरोपी अमित साहूची नार्कोटेस्ट करा, म्हणजे सत्य बाहेर येईल, अशीही मागणी त्यांनी केलीय. दरम्यान, अमित साहूच्या नार्कोटेस्टच्या मागणीसाठी पोलिसांनीही कोर्टात अर्ज दाखल केलाय. त्यामुळे अमित साहूची नार्कोटेस्ट होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लालंय.
आणखी पाहा























