एक्स्प्लोर
Nagpur Mumbai Railway सेवा हळूहळू पूर्वपदावर, मूर्तिजापुरातील मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर परिसरात काल संध्याकाळी धुव्वाधार पाऊस झाला. पावसामुळे माना-कुरूम गावाजवळ रेल्वे ट्रॅकखालील भराव वाहून गेला होता. यामुळे मुंबई आणि नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक काल संध्याकाळी ६ वाजल्यापासून पूर्णपणे थांबली होती. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काहींचे मार्ग बदलण्यात आले होते. आज पहाटेपासून मुंबई - हाव़डा रेल्वेमार्गावरील दोन्ही अप आणि डाऊनची रेल्वे वाहतूक सुरु झालीय. रेल्वे प्रशासनाकडून रात्रभर रेल्वे रुळाच्या दुरूस्तीचे काम सुरू होते. आता मुंबईकडून नागपूरला जाणारी वाहतूकही पूर्ववत कऱण्यात आली आहे
आणखी पाहा























