Nagpur : नागपूरच्या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस इंटर्न डॉक्टर्सचा संपाचा इशारा
नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच जीएमसी आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालय म्हणजेच मेयो या दोन वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे साडे तीनशे एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांनी इंटर्न म्हणून कोविड वार्डात काम करण्यास नकार दिला आहे. या दोन्ही वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस इंटर्न डॉक्टरांनी उद्यापासून संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या वर्षी कोरोना काळात ज्या प्रमाणे मुंबई आणि पुण्यातील इंटर्न डॉक्टर्सला कोविड कामांसाठी वेगळे मानधन देण्यात आले होते. तसेच मानधन नागपुरात त्यानांही देण्यात यावे, अशी मुख्य मागणी या डॉक्टरांनी केली आहे. जोपर्यंत कोविड कामांसाठी स्वतंत्र मानधन देण्याचे प्रशासन मान्य करत नाही. तोपर्यंत संपावर राहण्याचा इशारा जीएमसीच्या 200 आणि मेयोच्या 150 इंटर्न डॉक्टरांनी ने दिला आहे.























